Inhalers A-Z

इन्हेलरः गैरसमज व वस्तूस्थिती

जगभरातील बहुतेक व्यक्तींनी श्वसनाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी सर्वाधिक प्रभावी मार्ग म्हणून इन्हेलर्सचा स्वीकार केला असला तरी सुद्धा ह्या उपकरणाच्या संदर्भात अनेक गैरसमज आहेत. अशा प्रकारच्या गैरसमजामुळे काही लोकांना अनेक वेळा त्यांच्यासाठी इन्हेलेशन उपचारपद्धती सर्वोत्कृष्ठ आहे असे त्यांना सांगितले जाते तेव्हा त्यांना थोडी चिंता वाटते. परंतु, इन्हेलर्सचा उपयोग करणे सुरक्षित आणि प्रभावी आहे, त्यामुळे तुम्ही कोणतीही चिंता करता त्यांचा उपयोग करू शकता.

इन्हेलर्सचा वापर करण्याच वेळ येते तेव्हा लोकांच्या मनात असलेले हे काही सामायिक गैरसमज आहेतः

गैरसमज क्रमांक - इन्हेलर्समुळे त्याचे व्यसन लागते.

अशा प्रकारचा सामायिक गैरसमज जरी असला तरी इन्हेलर्सचा नियमित उपयोग केल्यास त्यामुळे तुम्हाला त्याचे व्यसन लागेल असा अर्थ होत नाही. इन्हेलर्समध्ये वापरण्यात येणाऱ्या औषधामुळे त्याची सवय लागत नाही. ते लवकर बंद केल्यास त्यामुळे लक्षणे पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते. साध्या शब्दात सांगायचे तर अस्थमा आणि सीओपीडी सारख्या श्वसनाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी इन्हेलर्सची आवश्यकता आहे, आणि त्यामुळे त्याचे व्यसन लागत नाही. इन्हेलर्सचा उपयोग तुमच्या डॉक्टरांनी लिहून दिलेल्या कालावधीसाठी करावा.

गैरसमज क्रमांक - इन्हेलर्सचा उपयोग केल्यास त्यामुळे लहान मुलांची वाढ खुंटते.

हा इन्हेलर्सच्या बाबतीत असलेला अगदी सामायिक गैरसमज आहे. इन्हेलर्समुळे अजिबात दुष्परिणाम होत नाहीत, कारण फुफ्फुसांमध्ये सोडल्या जाणाऱ्या औषधाचा डोस फार कमी असतो. खरं तर, ते नियमित घेतल्यास आणि लिहून दिलेल्या डोसने घेतल्यास, श्वसनाच्या समस्यांवर उपचार करण्यास वापरण्यासाठी इन्हेलर्स औषधोपचारांच सर्वाधिक सुरक्षित मार्ग आहे. प्रसिद्ध असलेल्या समजच्या अगदी विरूद्ध, ज्या मुलांनी त्यांच्या श्वसनाच्या समस्येवर उपचार करण्यासाठी नियमितपणे इन्हेलर्सचा उपयोग केला आहे, त्यांच्या उंचीत सामान्य प्रौढ व्यक्ती इतकी वाढ झाली आहे.

गैरसमज क्रमांक - श्वासावाटे घेतलेले स्टेरॉईड हानीकारक असतात

तुम्ही जेव्हा इन्हेलरचा उपयोग करता तेव्हा औषध समस्या असलेल्या ठिकाणी - फुफ्फुसांमध्ये - थेट पोहोचते. त्यामुळे, फुफ्फुसांमध्ये इन्हेलरद्वारे सोडल्या जाणाऱ्या औषधाचे प्रमाण अतिशय कमी असते. इतक्या कमी औषधाच्या प्रमाणामुळे कोणतीही हानी पोहोचत नाही. इन्हेलर्स लहान मुले आणि गरोदर स्त्रीया यांसह कोणही व्यक्तीद्वारा सुरक्षितपणे घेतले जाऊ शकते. त्याचबरोबर, इन्हेलच्या औषधोपचारामध्ये वापरल जाणार स्टेरॉईड, अॅथलेट आणि बॉडी बिल्डर्स त्यांच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी वापरतात त्यासारख्याच प्रकारची नसतात. अशा प्रकारे, तुम्हाला इन्हेलर्समुळे कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होण्याची शक्यता ही जवळपास शून्य असते. खरं तर, तुम्हाला तुमचे इन्हेलर घेण्याच्या तुलनेत त्याचा नियमित उपयोग करण्यामुळे होणारी कोणतीही ईजा फार कमी प्रमाणात असते.

गैरसमज क्रमांक - इन्हेलर्स हा शेवटचा पर्याय आहे

अस्थमा आणि सीओपीडी सारख्या श्वसनाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी इन्हेलर्स हा शेवटचा नव्हे तर औषधाचा पहिला पर्याय असतो. संपूर्ण जगभरा, श्वसनाच्या बहुतेक समस्यांवर उपचार करण्यासाठी इन्हेलर्स ही सर्वाधिक प्रभावी, सुरक्षित आणि सोयिस्कर पद्धत समजली जाते. इन्हेलर्समुळे तात्काळ आणि दीर्घकालीन आराम प्रदान करण्यासाठी औषधे समस्येच्या ठिकाणीफुफ्फुसाआणि वायूमार्गात येथे - पोहोचविणे शक्य होते. अस्थमा आणि सीओपीडीसारख्या तुमच्या श्वसनाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी इन्हेलेशन उपचारपद्धत सर्वाधिक प्रभावी मार्ग आहे, त्यामुळे तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या आणि आनंद देणाऱ्या सर्व गोष्टी रणे सुरू ठेवू शकता आणि कोणत्याही चिंतेशिवाय सामान्य सक्रिय जीवन जगू शकता.