Inhalers A-Z

इन्हेलर्स काय करावे व काय करू नये

अस्थमा आणि सीओपीडीसारख्या तुमच्या श्वसनाच्या समस्यांवर उपचार करण्याची वेळ येते तेव्हा, इन्हेलर्स हे तुमचे सर्वोत्कृष्ठ मित्र आहेत. तुम्हाला तुमच्या इन्हेलरचा प्रभावी पद्धतीने उपयोग करता यावा यासाठी आणि तुमच्या श्वसनाच्या समस्या नियंत्रणात ठेवण्यास मदत व्हावी यासाठी येथे काही सूचना देण्यात आल्या आहेत. तुम्ही इन्हेलरचा योग्य प्रकारे उपयोग करत आहात याची खात्री करून घेण्यासाठी रूग्णाच्या माहिती लिफलेटमध्ये नमूद करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करा (इन्हेलर्सचा उपयोग कसा करावा यासंबंधी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा).

काय करावे - 

  • संभ्रम टाळण्यासाठी तुमच्या कंट्रोलर आणि रिलिवर इन्हेलर्सना लेबल लावा.

  • तुमच्या ओठांवर इन्हेलरचे माऊथपिस घट्ट लावण्यापुर्वी संपूर्ण श्वास बाहेर सोडा.

  • तोंडावरून इन्हेलर बाजूला काढल्यानंतर किंवा आरामशीर वाटेल इतक्या वेळेपर्यंत तुमचा श्वास सुमारे १० सेकंदांसाठी धरून ठेवा. 

  • अजून एखाद्या डोसची गरज असल्यास, दुसरा डोस घेण्यापुर्वी किमान १ मिनिट प्रतिक्षा करा.

  • तुमच्या इन्हेलरमध्ये शिल्लक राहिलेल्या डोसेसच्या संख्येवर लक्ष ठेवा.

  • डोस काऊंटर असल्यास, जेव्हा डोस काऊंटरचा रंग बदलून हिरव्याचा लाल होईल तेव्हा कमी डोसेस शिल्लक आहेत हे त्याचे संकेत आहे, तेव्हा नवीन इन्हेलर खरेदी करण्याचा विचार करा.

  • रूग्णाच्या माहिती लिफलेटमध्ये नमूद करण्यात आलेल्या स्वच्छता करण्याच्या आणि धुण्यासंबंधीच्या सूचनांचे पालन करा.

  • प्रवास करताना तुमचे इन्हेलर त्याच्या मूळ पॅकेजिंगमध्ये बरोबर घेऊन जा आणि सोबत तुमच्या डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन ठेवा.

  • तुम्हाला इन्हेलर्सविषयी कोणतीही शंका असल्यास तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा आणि त्यांचे निरसन करून घ्या.

काय करू नये -

  • तुमच्या इन्हेलरमध्ये श्वास बाहेर सोडू नका.

  • डोस काऊंटरर्सच्या बाबतीत, डोस काऊंटरवरील संख्यांमध्ये फेरफार करू नका.

  • समाप्तीची तारीख उलटून गेल्यानंतर इन्हेलरचा उपयोग करू नका.

  • शिफारस केल्यापेक्षा अधिक डोस घेऊ नका.